Breaking News
Home / ॲग्रो संवाद / जवळा शहापूर येथीलआदर्श विद्यालयात सावित्रीआई स्मरण व गांधी स्मृतिदिन पारितोषिक वितरण- व्याख्यानाचे आयोजन

जवळा शहापूर येथीलआदर्श विद्यालयात सावित्रीआई स्मरण व गांधी स्मृतिदिन पारितोषिक वितरण- व्याख्यानाचे आयोजन

अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेलद्वारा संचलित जवळा शहापूर येथील आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पारितोषिके व गणवेश वितरण होणार आहे.सोबतच महिला पालक मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. निवेदन आणि साहित्यक्षेत्रात मोलाच्या कामगिरीसाठी सुनील इंदुवामन ठाकरे यांचा विशेष सत्कारदेखील आयोजित करण्यात आला आहे. त्यांचे याप्रसंगी ‘जगू कविता – बघू कविता’ या विषयावर व्याख्यानदेखील होईल. गुरुवार 30 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उपाख्य राजाभाऊ देशमुख राहतील. प्रमुख अतिथी तहसीलदार उमेश खोडके, गटशिक्षणाधिकारी अशोक खाडे,अधीक्षिका रजनी शिरभाते उपस्थित राहतील, या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती संस्थेचे उपाध्यक्ष अ. न. देशमुख, सचिव न. वै. देशमुख, मुख्याध्यापक सोपानदेव पळसपगार, शाळा समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी केली आहे.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *