Breaking News
Home / ॲग्रो संवाद / श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाद्वारा विज्ञान पारंगत आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाद्वारा विज्ञान पारंगत आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

अमरावती : केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी द्वारा हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प “मानव”, मानव संसाधन विकास विभागाच्या “स्वयम्” आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारा राबविण्यात येत असलेल्या “सीबीसीएस” योजनेच्या संदर्भात प्रसार, प्रचार आणि जागरूकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ त्यांच्या श्रेयांक वृद्धीसाठी करावा या उद्देशाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नोकरी व्यवसाय मार्गदर्शन कक्ष अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विषद करून पाहुण्यांचा परिचय कक्षाचे समन्वयक डॉ दिनेश खेडकर यांनी करून दिला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात श्री ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ दीपक धोटे यांनी या विद्यापीठाच्या सीबीसीएस योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेयांकामध्ये वाढ करता येणे आणि सोबतच आपल्या आवडीप्रमाणे विविध विषय शिकण्याची संधी विद्यापीठात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा या दृष्टीने ही योजना त्यांनी सखोलपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली व सर्वोतोपरी याचा फायदा घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

द्वितीय सत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च पुणे येथील डॉ अनुपमा शर्मा यांनी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट बायोटेक्नॉलॉजी द्वारा IISER, NCCS आणि Persistence Syetems यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या MANAV या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात संशोधन आणि शोधनिबंधाचे शास्त्रशुद्ध वाचन आणि त्या माध्यमातून मिळविल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावणाऱ्या या प्रकल्पात विज्ञान पारंगत आणि संशोधक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यानंतर भविष्यात अत्यंत उपयुक्त असे प्रमाणीकरण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मानव प्रकल्पाच्या संकेतस्थळावर जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची व्यक्तिशः नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.

शेवटच्या सत्रात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय धोरणाला अनुसरून मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सेस (MOOCS) अंतर्गत स्वतःची आवड व क्षमतेनुसार शिकण्यासाठी कार्यान्वित केल्या गेलेल्या स्वयम् या योजनेची माहिती यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी समन्वयक म्हणून भूमिका बजावत असलेल्या डॉ सुहास पाचपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती असलेल्या स्मार्टफोनचा वापर आता विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थाचे नवनवीन अभ्यासक्रम शिकण्यासाठी करावा आणि या जागतिक कलानुसार स्वतःचे करीअर घडवावे तसेच स्पर्धेत टिकण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात श्रेयांक प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेचा समारोप महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक हरिभाऊ  लुंगे यांच्या अध्यक्षिय भाषणाने झाला. विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांचा फायदा घेतल्यास त्याचा महाविद्यालयाच्या मानात सुद्धा भर पडणार असल्याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी करियर कक्षाचे डॉ रेवती खोकले, प्रा योगेश हुशारे, डॉ मयुरा देशमुख, डॉ नितीन बनसोड आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व विज्ञान पारंगत व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

About Editor Desk

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *