Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / महावितरण पुसद येथील त्या सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

महावितरण पुसद येथील त्या सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

पुसद : पुसद येथे कोरोना संक्रमीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पुसद विभागातील कर्मचाऱ्यांचे थ्रोट स्वॅब तपासले असता,त्या तेराही कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.

पुसद शहरातील औद्योगिक ग्राहकांचे मीटर वाचन करण्याचे काम साई इंटरप्राईजेस या एजंन्सीमार्फत करण्यात येते.पंरतू बुधवार दिनांक २२ जुलै रोजी या एजन्सीचा एका कर्मचाऱ्याचा कोरोना संक्रमीत अहवाल पॉसिटीव्ह आल्याने ,त्या कोरोना संक्रमीत कर्मचाऱ्याच्या संपर्कातील महावितरण शहर उपविभाग पुसद येथील १३ कर्मचाऱ्यांनी स्वताला होमक्वारंटाईन करून घेतले होते.

महावितरण विजेसारखी अत्यावशक सेवा देत असल्यांने महावितरण कर्मचाऱ्यांचा दैनंदिन वीज ग्राहकांचा संपर्क येतो शिवाय सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहणे गरजेचे असते . त्यामुळे कार्यकारी अभियंता संजय आडे व उपकार्यकारी अभियंता पुसद धर्मेंद्र राजपुत यांनी  वैद्यकीय अधिकारी पुसद यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांची थ्रोड स्वॅब तपासणी करण्यात यावी याबाबत विनंती वजा पत्र दिल्यानंतर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय पुसद येथे शुक्रवार दिनांक २४ जुलै रोजी महावितरणच्या त्या १३ कर्मचाऱ्यांची थ्रोट स्वॅब तपासणी केली असता त्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये त्यादृष्टीने महावितरण पुसद विभागाने आपल्या अंतर्गत असलेल्या कंत्राटदार एजन्सीला आवशक त्या सुचना आदीच दिल्या आहेत.तसेच महावितरण कार्यालयात वीजग्राहकाची वर्दळ बघता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व ग्राहकासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात आले आहे

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *