Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / संत नामदेव महाराज विश्वव्यापकच आहेत – सुनील इंदुवामन ठाकरे

संत नामदेव महाराज विश्वव्यापकच आहेत – सुनील इंदुवामन ठाकरे

अमरावती – संत नामदेव महाराज विश्वव्यापकच आहेत. त्यांनी अखिल मानवतेचा विचार करून कार्य आणि लेखन केलं. त्यांनी जवळपास 700-750 वर्षांपूर्वी केलेली क्रांती ही अद्भूतच होती. त्यांनी भारतभर केलेला प्रवास, लोकजागृती आणि विविध सामाजिक कार्यांमुळे आज ते ग्लोबल ठरतात. असे प्रतिपादन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. वैष्णव शिंपी समाज चंद्रपूरने या व्याख्यानाचे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन केले होते. ‘चंद्रपूर शिंपी समाज’ या फेसबूकपेजवर हे लाईव्ह व्याख्यान झाले. ‘विश्वव्यापक संत नामदेव महाराज’ हा व्याख्यानाचा विषय होता.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, की संत नामदेव महाराज हे ग्लोबल क्रांतिकारक हेाते. त्यांनी त्याकाळात केलेलं कार्य हे अद्भूतच होते. आज महाराष्ट्र, पंजाब, गुजराथ, राजस्थान, जम्मूसह जवळपास संपूर्ण भारतात त्यांची मंदिरे, गुरुद्वारा, त्यांच्या नावाचे तलाव, विहिरी आहेत. विविध प्रांतांत ‘नामदेव’ हे आडनाव म्हणूनदेखील लावले जाते. संत नामदेव हे एक उत्कृष्ठ संघटक होते. अभंगवृत्ताचे जनक आणि प्रतिभावंत कवी होते. आद्य वारकरी कीर्तनकार आणि संगीतकार होते. आज विविध देशांमध्ये त्यांचे अध्ययन आणि संशोधन होत आहे. माजी राष्ट्रपती ज्ञानी झेलसिंग यांच्या पुढाकारातून पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन केंद्र सुरू झाले.

संत नामदेव महाराजांनी वारकरीधर्माचा विस्तार केला. विविध जाती-धर्मातील लोकांचं संघटन केलं. संत जनाबाई, संत सोयराबाई सारख्या स्त्रिसंतांना वारकरीधर्मात मानाचं स्थान मिळालं. खूप क्लिष्ट असा भक्तिचा मार्ग त्यांनी सोपा केला. भक्तीचं लोकशाहीकरण केलं. सर्वांना भक्तीचा अधिकार मिळवून दिला. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी या विषयाच्या अनुषंगाने विविध संत नामदेव महाराजांच्या पैलूंवर प्रकाश टाकला. या आयोजनात राजूभाऊ लांडे, संजय तुरिले, अविनाश रेभणकर, आल्हाद बहादे, प्रवीण जुमडे, बल्लूजी जुमडे, सुमिरण टिकले, स्वप्निल कोहळे, कपीश उजगावकर, वैभव अडसुले, सुमीत ढगे, डॉ. दिनेश विडुळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. 

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *