Breaking News
Home / बातम्या / चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी मंदीतही शेतकऱ्यांच्या पाठीशी ! केली सहाशे टन चना खरेदी

चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी मंदीतही शेतकऱ्यांच्या पाठीशी ! केली सहाशे टन चना खरेदी

भंडारा : कोरोना टाळेबंदीत चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी ली.भंडारा  आधारभूत भावाने चना खरेदी करत आहे. आजवर ६०० टन चना खरेदी केला असुन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आधारभूत भावाने खरेदी होत असल्याने केंद्रावर शेतकरी बांधवांची नोंदणीसाठी गर्दी होत आहे. 

चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी  स्थापनेपासून वर्षभरात स्वच्छता व प्रतवारी युनीट, खरेदीसाठी लगणार्या सर्व वस्तू स्वखर्चाने विकत घेतल्या.नाफेड व महाएफसीच्या मदतीने आधारभूत भावाने 12 एप्रिल पासून चना खरेदी सुरू केली. आजवर ५०० शेतकऱ्यांनी कंपणीच्या केंद्रावर नोंदणी केली असून प्रक्रीया सुरू आहे.


कोरोणा संकटकाळात ६००टन चना खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.मार्केट बंद असल्यामुळे सुरुवातीला खरेदीसाठी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करताना त्रास झाला.आजवर २ लाख रुपयांचा बारदाना विकत घेतला. कंपणीने कामकाजासाठी युवकांची टीम तयार केली. बाजारपेठेत चन्याचा भाव ३५०० ते ३७०० रु.आहे. आधारभूत भाव ४८७५ रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  ५० लाख रुपये जास्त मिळतील.

चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे “ॲग्रो टाइम्स ” सोबत बोलतांना म्हणाले यापुढे प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ तसेच आम्ही येणाऱ्या काळात आमच्या शेतकरी बांधवांची काळजी घेऊन ग्रामीण जीवन अजून समृद्ध करणार आहोत. 

चना प्रतवारी मशिनसाठी वेळोवेळी दागोबा ईजींनीयरींग नागपूर व वासीसीचे  प्रा. संजय बनकर यांची मोलाची मदत होते. सुसुत्रेसाठी संचालक गुलाब वैद्य वंसता बांगळकर पुरुषोत्तम तेलमासरे विनोद धारणे योगेश हटवार गुरुदेव वैद्य नुतन तेलमासरे यांच्याकडे जबाबदारी आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *