अमरावती : अमरावती येथील अप्पर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयातील विधी सल्लागार, समन्वयक या पदाच्या प्रत्यक्ष मुलाखती सोमवार, दिनांक 23 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती रद्द करण्यात आलेल्या आहेत.
विधी सल्लागार, समन्वयक या पदासाठी सोमवारी मुलाखती नियोजित करण्यात आल्या होता. या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही कार्यालयात गर्दी होणार नाही, तसेच साथरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 23 मार्च रोजी नियोजित असलेल्या प्रत्यक्ष मुलाखती रद्द करण्यात येत असल्याचे अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांनी कळविले आहे.