Breaking News
Home / बातम्या / राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

आज नंदुरबार जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात २ मतदारसंघात ५ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात २ मतदारसंघात २ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात ५ मतदारसंघात ८ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात ११ मतदारसंघात १६ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात १० मतदारसंघात ११ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, पुणे जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात १० उमेदवार, लातूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात २१ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात ९ मतदारसंघात १७ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

2 comments

  1. Dear Team Agro Times,

    Hearty Congratulations !

    We are really happy and enjoyed the news on your website.

  2. Dear Editor

    Firstly congratulations to you and Agro Times team for bring out farmers newspapers.!

    We wish your team Agro Times all success !

    Yours Truly

    C Vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *