Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / प्रेरणादायी असा सोमनाथ प्रकल्प म्हणजे नंदनवनच होय 

प्रेरणादायी असा सोमनाथ प्रकल्प म्हणजे नंदनवनच होय 

डॉ.विकास आमटे जे कार्य हाती घेतात ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोमनाथ येथे श्रमसंस्कारातून  उभारण्यात आलेला टायर बंधारा हे होय. 
सोमनाथ मध्ये श्रमसंस्काराच्या अनेक यशस्वी छावण्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पन्नास हजारावर तरुणाईने प्रेरणा घेतली आहे आहे राज्याच्या अनेक भागात हे मदतीचे अनंत हात आता अनेक गरजुंना मदतीचा हात देत आहेत,बोट झडलेली ,हात खंगलेली माणसे जादुई ताकतीने विश्व निर्मिती करतांना तरुणाईने वरोरा,हेमलकसा येथील आदिवासी प्रकल्प असो इत्यादी ठिकाणी दुष्काळी परिस्थिती वर मात करून सोमनाथ मध्ये श्रमदान करून शेतीयोग्य जमिनीसाठी विहीर खणणे ,बंधारा बांधने वा तलावाचे खोलीकरण करणे इत्यादी मूलभूत कामे मोठ्या हिरीरीने तरुणाई करीत असते.बाबांना हीच तरुणाई असाच श्रमकरी समाज अपेक्षित होता ज्याची स्वप्नपूर्ती आम्ही करीत आहोत असे डॉ. विकास आमटे सांगतात. 
सोमनाथ सारख्या जंगलात शेती करिता छोटे छोटे बंधारे बांधून पाणी साठविण्याची व्यवस्था करून पाहिली पण कालांतराने ती तोकडी पडू लागली – वरुणराजाचे सुद्धा व्यवस्थापन पाहिजे तसे साथ देईनासे झाले त्यामुळे अगोदरच समाजाच्या दातृत्वावर उभारलेला महारोगी सेवा समितीचा प्रकल्प शेतीतील कमी उत्पनामुळे चिंता वाढविणारा होता परंतु डॉ. विकास आमटे ह्यांनी सोमनाथ येथे नवनवीन कल्पना अंमलात आणून आत्मविश्वासाने नव्याने संकटांचा सामना करीत बारमाही शेती साकार करून नवीन आदर्श स्थापन केलेला आहे . सोमनाथ मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष तर दूर केलेलंच आहे सोबतच जलसंधारणाचे नवीन प्रयोग तयार केल्या गेले आहेत कि ज्यामुळे सोमनाथ हे आनंदवन आणि इतर ठिकाणच्या प्रकल्पांसाठी ` अन्नदाता ` ठरले आहे. जंगलामध्ये बंधारा बांधताना पाणि अडविताना सोबतच पाण्याचा स्रोत कसा वाढेल जेणेकरून आसपासच्या गावांना सुद्धा ह्याचा फायदा होऊन सोबतच जैवविविधता सुद्धा वाढवून जतन करता येईल ह्याकडे डॉ. शीतल  आमटे -करजगी ह्यांचे कटाक्षाने लक्ष ठेऊनच कार्यरत होत्या . सोमनाथ मधील या प्रकल्पामुळे वाहणाऱ्या नाल्यावर ६-७ ठिकाणी बंधारे निर्माण करण्यात आलेले असून ,लहान – मोठे असे सतरा तलाव असून विहिरी सुद्धा तुडुंब वाहत आहेत,सोमनाथ चा हा जलव्यवस्थापनाचा यशस्वी प्रयोग राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे . 

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *