Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / विद्यार्थ्यांची नवनिर्मीती हाच मोठ्या उद्योगाचा पाया-किर्ती अर्जुन

विद्यार्थ्यांची नवनिर्मीती हाच मोठ्या उद्योगाचा पाया-किर्ती अर्जुन

अमरावती :आज संपूर्ण देशात मंदीचे सावट पसरले असून बेरोजगारीची समस्या सर्वांना भेडसावत आहे. सर्वजण सुदृढ आरोग्य, शिक्षण व उत्तम रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्नरत असतो. बेरोजगारीच्या या काळात नवनवीन गरजोपयोगी दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करून आज स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचा हा व्यापार उत्सव खरोखच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य निर्माण करतो. विद्याथ्र्यांनी प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मीती करून ते मार्केटमध्ये टिकवून ठेवणे हाच मोठ्या उद्योगाचा पाया ठरतो असे मौलिक मार्गदर्शन भावी उद्योजकांना श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन यांनी केले.

तक्षशिला महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित ‘बिजनेस फेस्ट-२०२०’ मध्ये बोलत होत्या. या व्यापार उत्सवाची सुरूवात संस्थेचे आधारस्तंभ स्मृतीशेष दादासाहेब गवई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाली. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी किर्ती राजेश अर्जुन, उद्घाटक डॉ. वर्षा देशमुख, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस.राव, प्रमुख उपस्थिती डॉ. वर्षा गावंडे, स्वागताध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल, डॉ. किशोर आकोटकर उपस्थित होते. ‘बिजनेस फेस्ट-२०२०’ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी विद्याथ्र्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकुण विविध वस्तूंचे ५३ स्टॉल लावले होते. या स्टॉलवरून ग्राहकांनी विविध गरजोपयोगी वस्तूंची खरेदी करून एकूण ७० हजार रूपयांची कमाई केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात किर्ती अर्जुन राजेश पुढे म्हणाल्या की, विद्याथ्र्यांनी या व्यापार उत्सवात मार्केटमध्ये कसे टिकून राहायचे याचे प्रात्यक्षिक महाविद्यालयीन जीवनात घेतले. त्यामूळे विद्याथ्र्यांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण होऊन उद्याचे यशस्वी उद्योजक नक्कीच निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

या व्यापार उत्सवात खादी, सूती, रेशीम कपडे, हॅंण्डक्राप्ट, ज्वेलरी, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, गिप्ट, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल अॅक्सेसरीज, जनरल स्टोअर, सजावटीच्या वस्तू, बॅग-पर्ससह विविध भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या व्यापार उत्सवात ग्राहकांच्या मनोरंजनाकडेही खास लक्ष देण्यात आले होते. यामध्ये काही भावी उद्योजकांनी कॉईन गेम, रिंग गेम, बलून गेमसह विविध गेम्स ग्राहकांना आकर्षित करित होते. या ‘बिजनेस फेस्ट-२०२०’ मध्ये ग्राहकांसाठी फायर पान, कोल्ड कॉफी, हाय टी सुद्धा उपलब्ध होते. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. वर्षा देशमुख म्हणाल्या की, ‘बिजनेस फेस्ट-२०२०’  हा खरोखरच नाविण्यपूर्ण उपक्रम असून असा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयाने राबविणे गरजेचे आहे. या उपक्रमातून आज जी बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे ती काही प्रमाणात विद्याथ्र्यांना स्वयंरोजगाराकडे नेऊन कमी करता येईल. पर्यायाने देशाची आर्थीक स्थिती भक्कम होऊन प्रत्येकाला रोजगार मिळेल. समस्या सर्वीकडेच असतात पण रडत बसण्यापेक्षा त्यावर मात कशी करावी हे या विद्याथ्र्यांनी राबविलेल्या उपक्रमातून दिसून येते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस.राव म्हणाले की, महाविद्यालयीन जिवनात असे नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्या सर्वांना जगण्याचे बळ देत असतात. महाविद्यालयीन जिवनातील प्रत्येक क्षण हे पटकन् निघून जातात. वेळ हा कुणासाठीच थांबत नाही पण जो वेळेबरोबर चालतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. तेव्हा सर्वांनी वेळ पाळण्याचा संकल्प करावा असे विद्याथ्र्यांना प्रा. राव यांनी सल्ला दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन पंडीत यांनी केले तर आभार प्रा. जितेंद्र देशमुख यांनी मानले. वाणिज्य व व्यवस्थान विभागाच्या वतीने कार्यक्रम प्रमुख प्रभारी प्रा. मयूरी तट्टे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. आकाशी सरवटकर, प्रा. दर्पण नागडा, प्रा. सचिन वरोकार, प्रा. सुमित खत्री, प्रा. निशा लढ्ढा, प्रसिद्धी प्रमुख प्रा. विलास फरकाडे, अनिल चौधरी, योगेश मानकर, मंगेश वाघ, विशाल राऊत, सुमित वानखडे, अक्षय सुरकार, मुक्ता भेंडे, गीता भोसले, आदिती गजभिये, रोहित बानगर, सचिन मेश्राम, अपेक्षा लांडगे, पंकज लिंगे, सुजाता आठवले, धीरज खोडस्कर, राम फुलबांदे, सनी भगत, अश्विन कांबळे, प्रतिक, अंकुश सहारे, गिरीष नागदिवे, आदर्श लांडे, तनुश्री किरक्टे, प्रभुदयाल कुरवाडे, किर्ती इंदुरकर, कोमल इंगळे, दर्शना वर, रविंद्र पाटील, हर्षल नाईकसह विद्याथ्र्यांनी प्रयत्न केले.
बॉक्स फोटो शेतकरी नावाने ‘मी’ माझी शेती नाय विकणार!‘बिजनेस फेस्ट-२०२०’ चे खास आकर्षण ‘बी.कॉम’मधील रविंद्र कास्देकर, कोमल इंगोले, सुरज वाडेकर, पूजा पाटील  यांनी शेतक:यांच्या समस्या मांडल्या. जेव्हा उपस्थित मान्यवरांनी या विद्याथ्र्यांच्या स्टॉलला भेट दिली तेव्हा एका व्यापा:याने शेतक:याला दाम दुप्पट देऊन त्याची शेती इंडस्ट्री उभारण्यासाठी घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी शेतक:याच्या भूमिकेत असलेला रविंद्र कास्देकर यांनी आपली छाती ठोकून सांगीतले की  ‘मी’ माझी शेती कोणत्याही परिस्थितीत नाय विकणार! तो शेतक:यांचे दु:ख डोळ्यात पाणी आणून सांगतो की, ‘मॅडम तुम्ही जर आमच्या शेतक:यांचे दु:ख नाय समजून घेतले ना तर एक दिवस गव्हाचा एक-एक दाणा सोन्याच्या किंमतीत विकत घ्यावा लागेल. शेतकरी जगला तरच या पृथ्वीतलावावरील माणसे जगतील असे संदेश या युवा शेतक:याने दिला असून शेती टिकविण्याची आर्त हाक मान्यवरांकडे केली. यावेळी दोन मिनीटासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकच स्तब्धता पसरली होती.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *