Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / कर्मयोगी फाऊंडेशनने दिला दिव्यागांना मदतीचा हात…

कर्मयोगी फाऊंडेशनने दिला दिव्यागांना मदतीचा हात…

बुटीबोरी : ज्या प्रकारे देशाच्या सीमेवर जाऊन देशाचे संरक्षण करणे ही देशसेवा आहे. त्याचप्रकारे देशातील आंधळ्या, अपंग, निराधार, व आजाराने पीडित लोकांना मदत करणे ही सुद्धा देशसेवाच आहे. याचीच प्रचिती कर्मयोगी फाऊंडेशनने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर प्रजासत्ताक दिनी दिली.

प्रमोद शेंडे व पौर्णिमा शेंडे हे आपल्या रितेश व सिध्देश या दोन मुलासोबत देवळी आमगाव ता. हिंगणा येथे राहतात. त्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. शेतमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यात रितेश हा त्याचा मोठा मुलगा ८२ टक्के अपंग आहे. तो दाहव्या वर्गात शिकत आहे. त्याचे गावातील घर पडल्यामुळे व त्यांना अजूनपर्यंत घरकुल न मिळाल्यामुळे ते गावाच्या बाहेर झोपडीत राहतात. या सर्व गोष्टींचा विचार करून, माणसातली माणुसकी जपण्यासाठी व रितेशला शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनने रितेशला कपडे देऊन व ५००० रुपयांची आर्थिक मदत करून शेंडे परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे म्हणाले की आम्हाला जीवनाचा अर्थ व शिक्षणाचा हेतू समजला आहे, गाडगेबाबा यांनी गोरगरिबांन साठी केलेल्या कार्यामुळे विदर्भाची ही भूमी पावन झाली आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या या अनमोल जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी निष्ठावंत मंडळींना सोबत घेऊन कर्मयोगी फाऊंडेशन हे सेवाभावी कार्य करत आहे.

यावेळी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे, मार्गदर्शक तुळशीदसजी भानारकर, उपाध्यक्ष कृष्णा सोनी, कोषाध्यक्ष विजय डोंगे संघटन प्रमुख शरद कबाडे, अशोक ठाकरे, देविदास ठाकरे, सुनील विश्वकर्मा,सौ.प्रविणा ठाकरे, शेषराव पारसे, धनराज मोडक, संजय वाडे, अनिलभाऊ श्रीरसागर, मैत्री ठाकरे व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनचे सरचिटणीस शिवाजी बारेवर व पुरुषोत्तम गिरजापुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *