Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / अपंग भरारी विकास बहुउदेशिय-सामाजिक संस्था व योग नृत्य परिवार-नागपूर यांच्या संयुक्त विद्दमाने इको फ्रेंडली संक्रात साजरी 

अपंग भरारी विकास बहुउदेशिय-सामाजिक संस्था व योग नृत्य परिवार-नागपूर यांच्या संयुक्त विद्दमाने इको फ्रेंडली संक्रात साजरी 

नागपूर : अपंग भरारी विकास बहुउदेशिय व सामाजिक संस्था व योग नृत्य परिवार,नागपूर  यांच्या संयुक्त विघमानाने इको फ्रेंडली संक्रात याचे जिजामाता बगीचा, नागपुर येथे आयोजन करण्यात आले होते. काम करा लाख मोलाचे-निसर्ग संवर्धनाचे,झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्ष देऊन  इको – फ्रेंडली संक्रात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमात सोबतच महिलांच्या मनोरंजनासाठी उखान्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेला परिक्षक म्हणून सौ.संगीता नरवाडे, रत्नप्रभा गुरव व डॉ.पुजा नाखले लाभल्या होत्या. एकुण 21 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यात 3 विजेते घोषित करण्यात आले.प्रथम क्रमांक अर्चना लोटावार, दि्व्तीय क्रमांक रत्ना पांढरे,व तृतीय क्रमांक शोभा राऊत यांचा आला .

प्रत्येक स्त्रीला वाण देताना काम करा लाख मोलाचे-निसर्ग संवर्धनाचे,झाडे लावा झाडे जगवा या फलक सोबत घेऊन फोटो काढण्यात आले. झाडे देऊन समाजाला झाड लावण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी असल्या आगळया वेगळया इको फ्रेंडली संक्रातीला यशस्वी करण्याकरीता किर्ती प्रतापवार,कांता टेवरे,अपूर्वा कुलकर्णी,संध्या खोब्रागडे,संध्या मुंदङा,सुहासिनी कानडे,शुंभागी कैलासवार यांचे सहकार्य लाभले.  

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *