Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा थाटात संपन्न.

समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा थाटात संपन्न.

अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती विद्यापिठाचा पदवीदान समारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात पदवी वितरण सोहळ्यात पदवी प्रदान केल्या जात आहे. त्याच मालिकेअंतर्गत श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बि.एस.डब्ल्यू, एम एस डब्ल्यू, कला वाणिज्य व विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास शिक्षण आणि क्रीडा प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुरेश काळे, प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापिठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच अमरावती चे अध्यक्ष प्रा.प्रदीपजी खेडकर, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला व दिव्यांग आर्ट गॅलरी अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे, एन एस एस सदस्य व संगीत अभ्यास मंडळ सदस्य अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजीव बोरकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यापिठ गीत महाविद्यालयाच्या चमूने सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य प्रा.डॉ. केशव गोरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील बी. एस. डब्ल्यू, एम. एस. डब्ल्यू. व बि.एससी. चे पदवीधर विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली.

मा. प्रा. प्रदीप खेडकर यांनी आपल्या भाषणातुन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होणाऱ्या पदवीदान समारंभाची संकल्पना पटवून दिली. त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातुन विद्यार्थांना उत्कृष्ट अभ्यासक्रमाची आखणी करून त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील जीवनात यशप्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा व्हावा असे कार्य घडावे यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. पदविप्राप्त विद्यार्थांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या

प्रा. डॉ.राजीव बोरकर यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व नोकरीच्या दिशेने वाटचाल आणि स्वावलंबी होण्यासाठी विविध उपाय सुचवले.

प्रा.विशाल कोरडे यांनी पदवी बरोबरच जबाबदारीची जाणीव बाळगणे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले. दिव्यांग आर्ट गॅलरी अकोला च्या विविध सामाजिक उपक्रमांत श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विविध विद्यार्थी भाग घेत असल्याचे सांगितले. लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँकेच्या माध्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यानी केले.

प्रा. डाॅ. संकेत काळे म्हणाले की, विद्यार्थांनी स्वत:ची कार्यक्षमता ओळखुन योग्य त्या क्षेत्रात नोकरी करावी व समाजाला समस्यामुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे म्हणत विद्यार्थांनी आपले महाविद्यालयाशी असेच ऋणानुबंध जोपासावे असे आवाहन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सुरेश काळे यांनी महाविद्यालयातील सर्व घटकांच्या सहकार्याने विद्यार्थी प्रगती प्रथावर वाटचाल करीत असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थांवर आपल्याला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. समाजकार्याबरोबर समाजसेवाही करण्यास महाविद्यालयाचे विद्यार्थी पुढे येत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.कविता कावरे तर आभार प्रदर्शन प्रा मनोहर वागतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.डॉ.रावसाहेब ठोके, प्रा.डॉ.सुधीर देशमुख, प्रा.डॉ.प्रफुल्ल पवार,प्रा.डॉ.संदीप भोवते,प्रा.नवनाथ बडे, प्रा.डॉ.बळीराम अवचार,प्रा.पांडुरंग पाचपुते,प्रा.बळवंत पाटील,प्रा.केतन वाकोडे,प्रा.डॉ.सुगत मोहोड, प्रा.अर्चना धर्मे,प्रा.डॉ.दिपाली देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *