Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम

अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम


अमरावती : निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषित केला आहे.

दि. 1 ऑक्टोंबर 2019 रोजी सुचना प्रसिध्द करण्यात येईल. दि. 15 व 25 ऑक्टोंबर रोजी वर्तमान पत्रातील सुचनेची पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. दावे व हरकती 6 नोव्हेंबर पर्यत स्विकारण्यात येतील. दिनांक 19 नोव्हेंबर पर्यत यादी हस्तलिखित तयार करुन प्रारुप  मतदान याद्यांची छपाई करण्यात येईल. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येतील. दि. 23 नोव्हेंबर  पासून 9 ते डिसेंबर  पर्यत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी असून 26 डिसेंबर पर्यत दावे व हरकती निकाली काढून पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येईल.  दिनांक 30 डिसेंबर रोजी मतदार याद्यांची अंतीम प्रसिध्दी करण्यात येईल.

अमरावती विभागील शिक्षक मतदार संघातील सर्व मतदारांना कळविण्यात येते की, अमरावती विभागातील सर्व तहसिलदार पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पात्र शिक्षकांनी विहित नमुन्यात मतदार नोंदणी करावी. ही मतदार यादी नव्याने तयार होत असल्यामुळे सर्व पात्र शिक्षकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता स्थानिक तहसिल / उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी 1  ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत करावी असे,  विभागीय मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदार संघ तथा विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे.

2 Attachments

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *