Breaking News
Home / ॲग्रो संवाद / शेतकऱ्याची अरुणाई मृत्यूनंतरही बघणार जग ! कुऱ्हाच्या खडसे परिवाराचे नेत्रदान करण्याचे आवाहन

शेतकऱ्याची अरुणाई मृत्यूनंतरही बघणार जग ! कुऱ्हाच्या खडसे परिवाराचे नेत्रदान करण्याचे आवाहन

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेले शेतकरी बलदेवराव खडसे यांच्या पत्नीचे अरुणा खडसे यांचे यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सर्व परिवार दुःखाच्या दरीत कोसळला. परंतु खडसे परीवाराने या दु:खाच्या प्रसंगातही सामाजीक व त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान घडवून  अंधांच्या जीवनात प्रकाशाची वाट निर्माण केली आहे. त्यामुळे अरुणा खडसे यांच्या  मृत्युनंतर  त्यांच्या नेत्रदानाला   कुटुंबीयांनी सहमती दिल्याने अरुणाई जगात नसल्या  तरीही  त्यांच्या  डोळ्यांनी कुणीतरी सुंदर जग निश्चित बघेल अशी प्रतिक्रिया त्यांचे पती बलदेवराव खडसे, मुलगा प्रा. निशांत खडसे, सून स्नेहल खडसे  व  निषमा मातकर, निताशा चिव्हाने व पूनम कचरे या तीन मुलींनी व्यक्त केली. मृत्युनंतर आपले डोळे दुसऱ्याच्या कामी यावेत ही विचारधारा समाजाला एक आदर्श ठरली आहे.

  खडसे परिवार एक प्रतिष्ठीत  परिवार म्हणून परिसरात ओळख आहे. पती बलदेवराव, मुलगा निशांत, सून स्नेहल व  निषमा मातकर, निताशा चिव्हाने व पूनम कचरे या तीन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा  त्यांचा परिवार. शेतकरी कुटुंब असल्याने सर्वसामान्य लोकांच्या समस्यांची जाणीव या परिवाराला आहे,  त्यामुळे  दुखीतांचे अश्रू पुसण्यासाठी हा परिवार नेहमी  पुढे असतो. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना ते मदत करतात,  परंतु या सुखीसंसाराला काळाची नजर लागली आणि पोळ्याच्या दिवशी अरुणाई आजारी पडल्या. त्यांना तात्काळ यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना दम्याचा त्रास होता, त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नव्हता. रुग्णालयात  मृत्यशी झुंज देत  असताना उपचारादरम्यान ७ सप्टेंबरला अरुणाबाईनी या जगाचा निरोप घेतला. जणू त्यांच्या मृत्यूने परिवारावार दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु  अशाही परीस्थित क्षणाचाही विचार न करता पती, मुलगा, सून व मुलींनी नेत्रदान करायचे ठरवले आणि आरोग्य विभागाच्या चमूला बोलावून नेत्रदान केले. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.  अरुणा उच्चशिक्षित होत्या. मनमिळाऊ स्वभाव, गरजूंना मदत करणे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर एकीकडे शेतकऱ्याची अरुणाई मृत्यूनंतर ही जग बघेल हा आशावादही मनात आहे.

About admin

Check Also

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *