Breaking News
Home / बातम्या / ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर  पत्रकार व लेखक चंद्रशेखर कुलकर्णी व पुलंचे साहित्य (वेबसाईट) संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या वेब ‍डेव्हलपर  स्मिता  मनोहर यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल.

            तसेच ही मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही सोमवार दि.१८, मंगळवार दि. १९  नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            बहुआयामी पु.ल.देशपांडे, गीतकार, संगीतकार, लेखक, नाटककार आणि कलाकार अशा सर्वप्रकारे पु.ल.देशपांडे यांचे कलेशी असलेले नाते, मला भावलेले पु.ल.देशपांडे, puldeshpande.net ही पुलंना समर्पित  पहिली  मराठी  भाषेमधील वेबसाईट, या वेबसाईटचे स्वरूप, पु.लं चे सर्व साहित्य आपण डिजिटल स्वरूपात आणताना करावे लागलेले प्रयत्न या वेबसाईटला मिळालेला प्रतिसाद याविषयी सविस्तर माहिती श्री. कुलकर्णी व श्रीमती मनोहर यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *