Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / या `लष्करी चाली ` ने शेतकरी त्रस्त

या `लष्करी चाली ` ने शेतकरी त्रस्त


महाष्ट्रातील गावा-गावांमध्ये एका लष्करी चालीची मोठीच चिंता आणि चर्चा आहे. हे लष्कर सुद्धा भारतात दाखल झालेले असून देशाच्या शत्रू सारखेच काम करीत असताना दुसऱ्या शत्रू ची गरजच नाही फरक इतकाच आहे शत्रू चे लष्कर सिमेजवळ जमा होते परंतु या लष्कराला सीमा लागू होत नाही बरे हे लष्कर आपले मित्रराष्ट्र अमेरिका याच्याच नावावर हे नवीन शत्रुत्व भारताला पोखरायला निघाले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत सहज पीक पाण्याबाबत चर्चा केल्यास त्याच्या मुखात आणि ललाटावर स्पष्टपणे लष्करी चाल कशी त्याच्या सुगीच्या दिवसांना पोखरत आहे हे निदर्शनास येत आहे.

हि सर्व चर्चा अमेरिकन लष्करी अळी बद्दल करतोय ! जिकडे – तिकडे ह्या नवीन शत्रूने अमेरिकन लष्करी अळीधुमाकूळ घातला आहे . मका ,कापूस इत्यादीं पिकांमधुन अमेरिकन लष्करी अळीह्या शत्रूचा सहज प्रवेश होतांना आता पर्यंत निदर्शनास आले आहे ,खरिपापातून रब्बी असा सहज सोपा प्रवास हि अमेरिकन लष्करी अळीकरीत आहे . ३-४ फवारण्या नंतरही ह्या अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हें दिसून येत नाही.

एकीकडे भारतीय लष्कर अमेरीकेसोबत युद्ध अभ्यास करीत असतांना दुसरीकडे अमेरिकन लष्करी अळी ने इकडे थैमान मांडले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानी ने दिवसेंदिवस कंबरडे मोडत चाललेले आहे तेव्हा तेव्हा समस्त शेतकरी वर्ग ह्यावर प्रतिबंधक उपाययोजनांची आतुरतेने वाट पाहत आहे !

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *