Breaking News
Home / ॲग्रो तंत्र – मनी मंत्र (page 4)

ॲग्रो तंत्र – मनी मंत्र

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची ‘बीबीसी मराठी’, ‘उत्तर प्रदेश माहिती केंद्राला’ भेट

नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बीबीसी मराठी आणि उत्तर प्रदेश माहिती केंद्राला भेट देवून त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.           डॉ. पांढरपट्टे यांनी येथील कॅनॉटप्लेस भागात स्थित बीबीसी मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट अभिजित कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले …

Read More »

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना केंद्र अथवा राज्य शासनाकडून मदत देण्यात येईल. त्या व्यतिरिक्त गरज पडल्यास राज्यशासन आणखी मदत देईल, मात्र कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री …

Read More »

अवकाळी पावसाने व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करणार

मुंबई : राज्यात नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जळगाव, बीड,  अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यामधील 129 गावांमध्ये 1978 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे व गारपीटीमुळे 842 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून एकूण बाधित क्षेत्र 2820 हेक्टर इतके आहे. शेती पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले …

Read More »

प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी हितकारक ! डॉ.किशोर पुरी

अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेट-सेट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेसारखे उपक्रम संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र अध्यापक संघामार्फत राबविले जात असून ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हितकारक असल्याचे प्रतिपादन संघाचे सहसचिव डॉ.किशोर पुरी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रसायनशास्त्र अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षिस …

Read More »

उच्चदाब वितरण प्रणालीवरील जोडण्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले आहेत ते पूर्ण करण्यासाठी कमी उच्चदाबाच्या वाहिनीवरुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या उच्चदाब प्रणाली अंतर्गत कामे अपूर्ण असल्याबाबतचा प्रश्न सदस्य डॉ.राहूल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ.राऊत म्हणाले, परभणी …

Read More »

थकबाकीमुळे जिल्हयातील ११ हजार औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांवर होणार कारवाई

यवतमाळ : ज्यांच्याकडून प्राम्प्ट पेमेंट अपेक्षित आहे अशा जिल्हयातील ११ हजार १७ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाचे २९ कोटी ९३ लाख रूपयापेक्षा जास्त थकबाकी वाढल्याने महावितरणने या ग्राहकांविरूध्द आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मोहिम आखली आहे. शंभर टक्के कारवाईचे उध्दीष्टे असणाऱ्या या मोहिमेत कारवाई झाली कि नाही याची पडताळणी करण्यासाठी परिमंडळ कार्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्हयात आकस्मिक भेटी देऊन तपासणी करणार आहे. सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या या मोहीमेत थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयाने २९ फेब्रुवारीचे उध्दीष्ट दिले आहे. त्यामुळे नियमीत वीज बिलांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना अडथळा ठरणाऱ्या या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही पुर्व सूचना न देता कारवाई करणार असल्याचे निर्देश मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ श्रीमती सुचित्रा गुजर यांनी दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महावितरणच्या तीनही विभागाचा आढावा घेतला तर यवतमाळ विभागातील ४ हजार १३० वाणिज्यिक ग्राहक असे आहेत की ,ज्यांच्याकडे सर्वात जास्त म्हणजे १२ कोटी ७१ लाख १२ हजार रूपये वीज बिलाचे थकित आहे. पुसद विभागातील ०२ हजार ८२१ ग्राहकांकडे ०८ कोटी २७ लाख , तर पांढरकवढा विभागातील २ हजार ३८९ ग्राहकांकडे ०६ कोटी ३७ लाख रूपये वीज बिलाचे थकित आहे. औद्योगिक ग्राहकाचा विचार केला तर हिच थकबाकी यवतमाळ विभागातील ६४५ ग्राहकांकडे ९४ लाख ८० हजार रूपयाची आहे. 

Read More »

“उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषि वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे” या विषयावर आधारित दहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि  अनुसंधान परिषद द्वारे संचालित -कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषि वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे”या विषयावर आधारित दहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक २० …

Read More »

आता चेंडू राज्याच्या कोर्टात

साभार : vishalraje.com गेले काही दिवस केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्वितचर्वण सुरु होते. केंद्राचे काय चुकले, किंवा अर्थसंकल्पाने कसा अपेक्षाभंग केला, हा अर्थसंकल्प कसा चांगला आहे, हे सांगणार्‍यांची गर्दी होती. राज्यातील तिघाडी सरकारात सहभागी सर्वांनी या अर्थसंकल्पाचे निरुपयोगित्व जनतेच्या लक्षात आणून दिले. आता चेंडू राज्याच्या कोर्टात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (दि. 24) …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासुन

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार  दिनांक 24  फेब्रुवारी 2020  पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. विधान भवनात  विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, …

Read More »

वाळूज बजाज ऑटो कामगारांतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी 5 लाख 54 हजार रुपये

मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा तडाखा बसून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता शासनाला हातभार लावण्यासाठी वाळूज, औरंगाबाद येथील बजाज ऑटो लि.कामगार संघटना आणि भारतीय कामगार सेनेच्या कामगारांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख 54 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री निवासस्थानी …

Read More »