Breaking News
Home / बातम्या (page 41)

बातम्या

* दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची तोफ ब्रम्हपुरीत धडाडणार *

ब्रम्हपुरी : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल 18 ऑक्टोबरला विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. ते ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आपच्या उमेदवार एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या जाहीर सभेला दुपारी 3 वाजता संबोधित करणार आहेत. यावेळी मंचावर आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रिती मेनन, देवेंद्र वानखेङे, श्रमिक एल्गारचे अध्यक्ष राजेश्वर सहारे, लोकसभा …

Read More »

नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट

मुंबई, दि.16 : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटींतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने आज ‘टिनी मिरॅकल्स’ला भेट दिली. ‘टिनी मिरॅकल्स’ ही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर यांनी स्थापन केलेली आहे. डच विदेश व्यापार आणि विकास सहकार मंत्री सिग्रीड काग यांच्यासोबत शाही दांपत्य टिनी मिरॅकल्स, मुंबई येथे …

Read More »

ब्रम्हपुरीत पारोमिता गोस्वामी यांना निवडून देण्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे मतदारांना आवाहन 

सिंदेवाही- राजकारणी हे सत्तेतून पैसा आणि  पैशातून सत्ता मिळवित आहेत. विजय वङेट्टीवार आणि मितेश भांगङिया हे दोघेही लोकांना विरोधक दिसत असले तरी आतून मिलीभगत आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून दोघांनी मिळून सत्तेच्या आधारावर कंपन्या सुरू करून ठेकेदारी सुरू केली आहे, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिंदेवाही …

Read More »

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

मुंबई, दि. 16 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील. लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत …

Read More »

१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत वादळी पावसाचा अंदाज; पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

मुंबई : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील …

Read More »

कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.             भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक …

Read More »

कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक तथा कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी विधानसभा निवडणूक-२०१९ मिलिंद भारंबे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  बुधवार दि. 16 आणि गुरुवार दि. 17 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच ‘दिलखुलास’ हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही बुधवार दि. १६ आणि गुरुवार दि. १७ ऑक्टोबर २०१९ …

Read More »

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचनाची सवय आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन आणि लेखन करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 235 महिला उमेदवार

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सर्व उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Read More »