Tur Market तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी अंतिम तारीख: 30 एप्रिल 2025

Tur Market केंद्र सरकारने तूर खरेदीत मोठी प्रगती केली: शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

केंद्र सरकारने यंदा तूर खरेदीसाठी मूल्य समर्थन योजने अंतर्गत मोठी प्रगती केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ३.४० लाख टन तुरीची हमीभावावर खरेदी करण्यात आली आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आणि देशांतर्गत डाळींच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे आहे.

मंत्रालयाने देशातील ९ प्रमुख तूर उत्पादक राज्यांमधून एकूण १३.२२ लाख टन तूर खरेदीला मान्यता दिली आहे. सरकारचा उद्देश आहे की, १० लाख टनांचा बफर स्टॉक तयार करणे आणि गरज भासल्यास खुल्या बाजारात पुरवठा करून किंमती स्थिर ठेवणे.

कर्नाटकमध्ये सर्वाधिक तूर खरेदी

कर्नाटकमधून सर्वाधिक १.३० लाख टन तूर खरेदी झाली आहे, आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना ₹७,५५० प्रति क्विंटल हमीभाव मिळाला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने त्यावर ₹४५० प्रति क्विंटलचा अतिरिक्त बोनस दिला आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यांनीही खरेदी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे.

हे पण वाचा:
Ujani Dam Alert उजनी धरणातून मोठा विसर्ग, भीमा नदीकाठी पुराचा धोका; पंढरपूर वारीवरही सावट? (Ujani Dam Alert)

हरभऱ्याच्या खरेदीमध्ये मंद गती

तूर खरेदीच्या यशस्वी प्रक्रियेच्या तुलनेत, सरकारने २७ लाख टन हरभऱ्याच्या खरेदीला मंजुरी दिली असली, तरी घरगुती बाजारात त्याचे दर हमीभावापेक्षा अधिक असल्यामुळे खरेदीचा वेग मंदावला आहे. सरकारने आतापर्यंत २८,७०० टन मसूर आणि ३,००० टन मुगाची खरेदी केली आहे.

तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी अंतिम तारीख: 30 एप्रिल 2025

तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख आज, ३० एप्रिल २०२५ आहे. तूर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. यावर्षी तुरीचा हमीभाव ₹७५५० प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.

नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांसह त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे:

हे पण वाचा:
Maharashtra Weather Forecast राज्यात आज रात्री आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही मुसळधार (Maharashtra Weather Forecast)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा
  • ८ अ (जमीन संबंधित कागदपत्रे)

मंत्र्यांचा आवाहन

विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment