pik Vima update “एक रुपयात पीक विमा योजना अडचणीत” – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट कबुली

मुंबई | प्रतिनिधी

pik Vima update शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली “एक रुपयात पीक विमा योजना” सध्या अडचणीत आली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, “या योजनेचा काही लोकांनी ग्रामीण भागात गैरवापर केला आहे – अगदी ‘चुना’ लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.”

गैरवापरामुळे थेट हस्तक्षेप, बदलांचा विचार pik Vima update

अजित पवार यांनी सांगितले की, शासनाने योजनेच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतला असून, महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. “आम्ही मागे ही योजना सुरुवात केली होती – एक रुपयात पीक विमा – पण ती सध्या अडचणीत आली आहे. त्यामुळे आम्ही ती काढून घेतली आहे. आता जी योजना शेतकऱ्यांच्या खऱ्या हिताची असेल, तीच आम्ही राबवणार आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा:
Ujani Dam Alert उजनी धरणातून मोठा विसर्ग, भीमा नदीकाठी पुराचा धोका; पंढरपूर वारीवरही सावट? (Ujani Dam Alert)

मुख्यमंत्री आणि मंत्रिगट यांचा सहभाग

योजनेविषयी घेतलेल्या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री माणिकराव कोकाटे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सहभागी असून, यावर विशेष बैठक झाल्याची माहिती पवारांनी दिली. याच बैठकीत नव्या योजनेवर चर्चा झाली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

DBT प्रणालीची शक्यता pik Vima update

नवीन योजनेत डायरेक्ट प्रोत्साहन अनुदान (DBT) प्रणालीचा अवलंब करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येईल. यामुळे पारंपरिक विमा प्रक्रियेतील विलंब, कागदपत्रांची झंझट, आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येईल, असा शासनाचा विश्वास आहे.

शेतकऱ्यांमध्ये वाढलेली चिंता

दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आहे. अनेक शेतकरी अद्याप मागील हंगामाच्या पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत. अशात एक रुपयात मिळणाऱ्या योजनेचा बंद होण्याचा इशारा हा शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरत आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Weather Forecast राज्यात आज रात्री आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही मुसळधार (Maharashtra Weather Forecast)

शेतकरी संघटनांनीही सरकारकडे योजनेच्या पुनर्रचनेची, तसेच पारदर्शक आणि शाश्वत पर्याय देण्याची मागणी केली आहे.

हे पण वाचा:
Ujani Dam Update उजनी धरणाच्या पाणीपातळीत बदल: गेल्या २४ तासांत १० हजार क्युसेकने विसर्ग वाढवला; भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा Ujani Dam Update

Leave a Comment