monsoon update मान्सून १३ मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता

monsoon update हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, यंदा मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात १३ मेच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मान्सून याच भागात १९ मे रोजी दाखल झाला होता.

“वेळेआधी मान्सून” या बातम्यांची खरी माहिती

सध्या विविध माध्यमांत “मान्सून वेळेआधी दाखल होणार” अशा बातम्या दिसत आहेत. याचा अर्थ केवळ अंदमान भागासाठी आहे. महाराष्ट्रातील किंवा केरळमधील मान्सून आगमनाशी याचा थेट संबंध नाही.

अंदमानमधील आगमन आणि केरळमध्ये मान्सून यायची वेळ वेगळी

हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की अंदमानमध्ये मान्सून लवकर दाखल झाला, तरी केरळमध्ये तो लवकरच येईल, असं ठरवत नाही. केरळमध्ये मान्सून कधी येईल, याचा स्वतंत्र अंदाज हवामान विभाग १५ मे रोजी प्रसिद्ध करणार आहे.

हे पण वाचा:
Ujani Dam Alert उजनी धरणातून मोठा विसर्ग, भीमा नदीकाठी पुराचा धोका; पंढरपूर वारीवरही सावट? (Ujani Dam Alert)

१५ मे रोजी होणार अधिकृत घोषणाः हवामान विभागाची पत्रकार परिषद

हवामान विभाग १५ मे रोजी एक प्रेस रिलीज व पत्रकार परिषद घेऊन केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल, याचा अधिकृत अंदाज जाहीर करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचेल याचा अंदाज दिला जाईल.

महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यास साधारणतः ६–७ दिवस लागतात

सामान्यतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ६–७ दिवसांत तो तळकोकणात पोहोचतो. यंदा महाराष्ट्रात तो नेमका कधी पोहोचेल, याबाबतची माहिती हवामान विभागाच्या पुढील घोषणेनंतर स्पष्ट होईल.

हे पण वाचा:
Maharashtra Weather Forecast राज्यात आज रात्री आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही मुसळधार (Maharashtra Weather Forecast)

Leave a Comment