Ladki Bahin Yojana Maharashtra लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana Maharashtra तांत्रिक अडचणीनंतर हप्त्याचे वितरण सुरू, 10 तारखेपर्यंत पात्र महिलांना लाभ

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल 2025 महिन्याचा दहावा हप्ता आजपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याआधी याचा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हप्त्याचे वितरण 1 मे 2025 पासून सुरू करण्यात आले आहे.

राज्य सरकारने योजनेसाठी 2025-26 आर्थिक वर्षात 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी स्टेट बँक खात्यावर वर्ग करून सामाजिक न्याय व महिला बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पात्र महिलांच्या खात्यात थेट निधी, अपात्र महिलांना लाभ नाही

सध्याची वितरण प्रक्रिया आज, उद्या आणि परवा या तीन दिवसांत पूर्ण होणार असून, 10 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, त्यामुळे अशा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

बँक खातं तपासा आणि प्रतिक्रिया शेअर करा

लाभार्थींनी आपले बँक खाते तपासून घ्यावे. हप्ता जमा झाल्यास किंवा अडचण आल्यास, कमेंटद्वारे आपला अनुभव शेअर करावा. तुमचा अनुभव इतर महिलांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

Leave a Comment