Kanda sathvnuk कांदा साठवणुकीसाठी कोणती पावडर वापरावी? योग्य वापरामुळे टिकवण क्षमतेत वाढ, चुकीच्या वापरामुळे होतो मोठा तोटा

Kanda sathvnuk पावडर वापर म्हणजे चमत्कार नव्हे, तर फक्त पूरक उपाय

सध्या राज्यभरातील अनेक शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत. शेतकऱ्यांचे एकच मुख्य उद्दिष्ट असतं—कांदा जास्तीत जास्त दिवस टिकावा आणि त्याला सड, कोजळी किंवा बुरशी लागू नये. मात्र साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरींचा योग्य वापर झाला नाही, तर कांदा टिकण्याऐवजी लवकरच खराब होतो. बाजारात मिळणाऱ्या विविध पावडरी वापरताना काही शेतकरी अतिरेक करतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात. त्यामुळे योग्य माहिती आणि काटेकोर प्रमाणात वापर केल्यासच पावडरीचा उपयोग होतो.

कांद्याचे टिकवण व्यवस्थापन लागवडीपासून सुरू होतं

पावडर फक्त पूरक आहे. खरी टिकवण क्षमताच वाढवायची असेल, तर कांद्याचं व्यवस्थापन लागवडीतूनच सुरू झालं पाहिजे. सुरुवातीला खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, वेळेवर काढणी या गोष्टींचं शास्त्रशुद्ध पालन झालं तरच पावडरचा उपयोग होतो. पावसात भिजलेला कांदा, उशिरा काढलेला किंवा शेवटच्या अवस्थेत युरिया मारलेला कांदा तुम्ही कितीही पावडरी टाकल्या तरीही टिकत नाही.

हे पण वाचा:
Ujani Dam Alert उजनी धरणातून मोठा विसर्ग, भीमा नदीकाठी पुराचा धोका; पंढरपूर वारीवरही सावट? (Ujani Dam Alert)

hawamaan andaaz राज्यात पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; घाटमाथ्याच्या भागांपासून विदर्भापर्यंत व्यापक परिणाम

कांदा साठवताना वापरल्या जाणाऱ्या पावडरमधून पुढील फायदे अपेक्षित असतात:

  • कोजळी, बुरशी व सड थांबवणे
  • मोड येणे रोखणे
  • कीटक व अळ्या रोखणे
  • खराब कांद्याचा संसर्ग इतरांपर्यंत जाण्यापासून प्रतिबंध

परंतु, पावडर वापरूनही जर काढणीवेळी कांदा योग्य प्रकारे शिजलेला नसेल, योग्य वेळी काढलेला नसेल, पावसात भिजलेला असेल किंवा शेवटच्या अवस्थेत खतांचा वापर केलेला असेल, तर पावडर काहीच उपयोगी पडत नाही.

हे पण वाचा:
Maharashtra Weather Forecast राज्यात आज रात्री आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही मुसळधार (Maharashtra Weather Forecast)

बाजारात मिळणाऱ्या पावडऱ्यांचे योग्य प्रकार

डेसिकेटर ही जैविक (ऑरगॅनिक) पावडर असून कोजळी आणि मोड येणं रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही पाच किलोची पावडर साधारणतः ५०० ते ५५० रुपयांना मिळते. दुसरी म्हणजे थायमेट किंवा फोरेट. या दोन्ही पावडर चाळीच्या तळाशी टाकल्या जातात. सर्प, विंचू किंवा अळ्या या कीटकांचा त्रास टाळण्यासाठी थायमेट अतिशय उपयुक्त आहे. ही पावडर वापरल्याने पावसाळ्यात चाळ सुरक्षित राहते.

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून नवा निर्णय; योजनेच्या हमीवर मिळणार कर्ज आणि आर्थिक भांडवल ladki Bahin Yojana

तिसरी पावडर म्हणजे सल्फर ८०%. ही ‘सल्फ 80’, ‘कोसाविट’ अशा नावांनी बाजारात मिळते. उष्णतेची तीव्रता असलेल्या सल्फर पावडरचा उन्हाळ्यात फारच कमी प्रमाणात वापर करावा. हिचा वापर पावसाळ्यात अधिक प्रभावी ठरतो. कूल डस्ट आणि कांदा सम्राटसारख्या जैविक पावडरींचाही वापर फायदेशीर ठरतो.

हे पण वाचा:
Ujani Dam Update उजनी धरणाच्या पाणीपातळीत बदल: गेल्या २४ तासांत १० हजार क्युसेकने विसर्ग वाढवला; भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा Ujani Dam Update

वापर कसा करायचा? प्रमाण किती?

पावडरचा वापर करताना दोन प्रकारच्या पावडरी मिक्स कराव्यात—एक बुरशीनाशक आणि दुसरी कीटकनाशक. बुरशीमुळे कोजळी, काळेपणा, सड यासारख्या समस्या निर्माण होतात तर अळ्यांमुळे सडलेला कांदा चांगल्या कांद्यात सड निर्माण करतो. यासाठी चाळीच्या प्रत्येक थरात कमी प्रमाणात पावडर वापरावी.

pot hissa nakasha पोटहिश्श्याच्या जमिनींच्या दस्तनोंदणीसाठी नवा नियम लागू; दस्तनोंदणी करताना पोटहिश्श्याचा नकाशा जोडणे बंधनकारक

३०–४० फूट लांब चाळीसाठी महिन्याला केवळ ५०० ग्रॅम ते १ किलो पावडर पुरेशी ठरते. काहीजण ३–५ किलो वापरतात, पण ही चुकीची पद्धत आहे. दर १५ दिवसांनी २००–२५० ग्रॅम पावडर टाकल्यास तिचा परिणाम अधिक टिकतो. एकदम संपूर्ण पावडर टाकल्यास तिचा प्रभाव लवकर संपतो आणि खऱ्या गरजेच्या वेळी ती उपयोगी पडत नाही.

हे पण वाचा:
Maharashtra Monsoon Update 2025 राज्यात मान्सूनचा जोर वाढला; घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातही जोरदार पाऊस, वाचा सविस्तर (Maharashtra Monsoon Update 2025)

प्रभावी पावडरी कोणत्या?

डेसिकेटर (Dessicator)

  • पूर्णतः जैविक (ऑरगॅनिक) पावडर
  • साइड इफेक्ट नाही
  • कोजळी, मोड रोखण्यासाठी प्रभावी
  • एक ५ किलो पॅकेट ५००–५५० रुपयांमध्ये उपलब्ध

थायमेट (Thimet) किंवा फोरेट (Phorate)

  • चाळीच्या तळाशी वापर करावा
  • सर्प, विंचू, मच्छर व अळ्या रोखण्यासाठी प्रभावी
  • साठवणुकीदरम्यान वापर करावा
  • केवळ खाली टाकायचा; कांद्यामध्ये मिसळू नये

सल्फर ८०% (Sulphur 80%)

  • ‘सल्फ 80’ किंवा ‘कोसाविट’ नावाने बाजारात उपलब्ध
  • उन्हाळ्यात कमी प्रमाणात वापर करावा
  • पावसाळ्यात वापर अधिक प्रभावी
  • साठवलेल्या कांद्यामधील बुरशीजन्य संक्रमण रोखतो

कूल डस्ट (Cool Dust) आणि कांदा सम्राट

  • दोन्ही ऑरगॅनिक पावडरी
  • बुरशी, सड आणि घामट वास रोखण्यासाठी उपयुक्त\

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी – मार्च व एप्रिल महिन्यांचे थकीत मानधन बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात niradhar yojana

निष्कर्ष

पावडर ही फक्त एक पूरक उपाय आहे. कांद्याची टिकवण क्षमता वाढवायची असेल, तर लागवड ते काढणी आणि साठवणूक पर्यंत प्रत्येक टप्प्यावर शास्त्रशुद्ध पद्धती पाळली गेली पाहिजे. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पावडरचा वापर केल्यास कांद्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि आर्थिक नुकसान टाळता येते. शेतकऱ्यांनी अनावश्यक पावडर किंवा अति प्रमाणात वापर टाळून, वैज्ञानिक मार्गदर्शनानुसार साठवणूक करणे गरजेचे आहे. यामुळे बाजारात टिकणारा, चांगल्या दराने विकला जाणारा कांदा तयार होतो.

हे पण वाचा:
Maharashtra Weather Update राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट; वाचा सविस्तर हवामान अंदाज (Maharashtra Weather Update)

Leave a Comment