farmer ID नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी फार्मर आयडी बंधनकारक

farmer ID फार्मर आयडी बंधनकारक: राज्य शासनाची महत्त्वाची घोषणा

राज्य शासनाच्या कृषी विभागाने 29 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा जीआर निर्गमित केला आहे. या जीआरनुसार, येत्या 15 जुलै 2025 पासून, शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान भरपाईसाठी केवळ फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाईल. याचा अर्थ, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी, विशेषतः नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी बंधनकारक केले गेले आहे.

ग्रीस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बंधनकारक

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ग्रीस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र (फार्मर आयडी) काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलद आणि प्रभावी पद्धतीने योजनांचा लाभ मिळवता येईल. यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक विमा भरणे, पीएम किसान योजनांसारख्या योजनांचा लाभ घेणे, आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक होईल.

पंचनामे करताना फार्मर आयडी अनिवार्य

शेती पिकांच्या नुकसानीसाठी पंचनामे करत असताना, फार्मर आयडी नंबर आवश्यक ठरणार आहे. तसेच, शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया करताना सुद्धा फार्मर आयडी साठी एक ऑप्शन दिली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत फार्मर आयडी नंबरचा समावेश अनिवार्य केला आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Pre-Monsoon Rain राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, तापमानात घट; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट Maharashtra Pre-Monsoon Rain

फार्मर आयडी कसा काढावा?

शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी कोणत्याही प्रकाराची कागदपत्रांची आवश्यकता नाही. फक्त आधार नंबर, मोबाईल नंबर, आणि शेत जमिनीचा सर्वे नंबर असणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपला फार्मर आयडी नोंदणी करू शकतात.

नवीन योजनांचा लाभ आणि मदत

याचप्रमाणे, आता जीआरनुसार, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी होणाऱ्या मदतीसाठी फार्मर आयडी असावा लागेल. यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी सर्व प्रकारची नुकसान भरपाई या आयडीच्या आधारे दिली जाईल.

हे पण वाचा:
Cotton Planting 2025 Complete Guide कापूस लागवड (Cotton Planting 2025 Complete Guide): यशस्वी नियोजनासाठी सविस्तर मार्गदर्शक

Leave a Comment