farmer good news आजपासून पाच योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार – मंत्रिमंडळ बैठक

farmer good news शेतकरी, महिला आणि गरजू लाभार्थ्यांसाठी दिलासादायक पाऊल

पुणे: काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि अन्य लाभार्थ्यांसाठी पाच महत्वाच्या योजनांबाबत निर्णय घेण्यात आले. या निर्णयांनुसार, आज दिनांक 1 मे 2025 पासून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजना

या योजनेचा 6 वा हप्ता काही तांत्रिक कारणास्तव न मिळालेल्या किंवा मागील हप्ते थकलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा केली जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून, योजनेंतर्गत नियमित लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.

संजय गांधी निराधार योजना

राज्य शासनाने 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेल्या जीआरनुसार, डिसेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीतील महा-पेंशनची रक्कम DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

2024 च्या पीक नुकसान भरपाईची रक्कम

2024 मध्ये शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी, ज्या शेतकऱ्यांची नावे नुकसानभरपाईच्या यादीत आहेत आणि ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम आजपासून वितरित केली जाणार आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप

हेक्टरी 20 हजार  दोन हेक्टर मर्यादित नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटपासाठी राज्य शासनाने जीआर निर्गमित केला असून, त्या अंतर्गतही आजपासून रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता म्हणजेच ₹1,500 इतकी रक्कम आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment