Dr. Ramchandra Sable उष्णतेच्या लाटा आणि कृषी सल्ला: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
पुणे: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आगामी चार दिवस (23 एप्रिल ते 26 एप्रिल) अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हवामानातील बदल होणार आहेत. आज, 23 एप्रिल रोजी, हवेचा दाब 1008 हेक्टापास्कल असला तरी, 24 एप्रिलपासून हवेचा दाब 1006 हेक्टापास्कलपर्यंत कमी होईल. यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी पाऊस होईल.
पावसाची शक्यता आणि उष्णतेचे वाढते प्रमाण
पावसाची शक्यता काही भागांत असल्याने, धाराशीव, नांदेड, आणि सोलापूर येथे आज 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तरीही, हवामान उष्ण आणि कोरडे राहील. विशेषतः एप्रिल महिना अखेरपर्यंत दुपारी अत्यधिक उष्ण हवामानाची शक्यता आहे आणि यापुढे देखील उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
उन्हाळी पिकांची आणि फळभाजीपाला पिकांची पाणी गरज वाढली आहे. शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की ते दोन पाण्याचे पाळीतील अंतर कमी करावं आणि ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. तसेच, शेतकामे पहाटेपासून सकाळपर्यंत आणि सायंकाळी करावीत. जनावरांना पाणी प्यायला चार वेळा दिलं जावं. कुकुटपालन शेडमध्ये बाजूला झाप बांधून त्यावर पाणी शिंपडावं, त्यामुळे शेडमध्ये वातावरण थंड राहील.
सार्वजनिक सूचना
डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या हवामान अंदाजानुसार, उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती तयारी केली पाहिजे. शेतकऱ्यांनी या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.