Bhendwal Ghatmandni Buldhana भेंडवळमध्ये 350 वर्षांची परंपरा कायम; यंदाची भाकडूक जाहीर

Bhendwal Ghatmandni Buldhana पीक पाण्याचा अंदाज सकारात्मक, पण देशासाठी संकटाचा इशारा

भेंडवळ (जि.  बुलढाणा): आज भेंडवळ गावात 350 वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक भाकडूक वाचनाची परंपरा यथावकाश पार पडली. या अनोख्या विधीत यंदाही निसर्ग, शेती, देशाची स्थिती आणि भविष्यातील संकटांचा संकेत देणारी भाकडूक जाहीर करण्यात आली.

यंदा पीक पाणी सामान्य राहील, असा आशादायक संदेश शेतकऱ्यांना मिळाला आहे. विशेषतः पावसाच्या संदर्भात अंदाज देताना सांगितले गेले की, पहिला महिना कमी-अधिक, दुसरा महिना चांगला, तिसरा महिना साधारण आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशावर संकटाची छाया; राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेचा इशारा

यंदाच्या भाकडूकीत देशावर मोठ्या संकटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे संकेत भाकडूक वाचनात दिसून आले. याचबरोबर, देशातील ‘राजाची गादी’ अनिश्चित राहील, त्यामुळे आर्थिक स्थिती तणावपूर्ण राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा:
AgriStack Porta शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (Farmer Unique ID) बंधनकारक; ३१ मे पूर्वी १००% नोंदणीचे (AgriStack Porta) उद्दिष्ट, अन्यथा शासकीय योजनांपासून वंचित राहण्याचा धोका

शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

पावसाचा सकारात्मक अंदाज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण आहे. पीकपाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण योग्य राहिल्यास चांगले उत्पादन मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Devasthan and Watan Land देवस्थान, वतन जमिनींच्या खरेदी-विक्री नोंदणीस तात्काळ स्थगिती; राज्य शासनाचा मोठा निर्णय (Devasthan and Watan Land)

Leave a Comment