hawamaan andaaz दिवस-रात्र तापमानात वाढ, काही जिल्ह्यांत उष्णतेचा तीव्र प्रभाव
पुणे: 30 एप्रिल सायंकाळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची स्पष्ट शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीच्या आसपास किंवा थोडं कमी राहू शकतं. मात्र, उर्वरित राज्यात दिवसाचे आणि रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा अधिक राहणार आहे. 3 ते 4 मेपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी वातावरण अनुकूल होईल, आणि त्या कालावधीत तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
कुठे किती उष्णतेची लाट?
नाशिक, पालघर, नंदुरबार, सोलापूर, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे नेहमीपेक्षा 1 ते 2 दिवस अधिक उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे.
तर चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली येथे 3 ते 4 दिवस जास्त उष्णतेचा प्रभाव जाणवेल.
राज्यातील इतर भागांमध्ये सरासरीप्रमाणेच उष्णतेची लाट राहील.
पावसाचा अंदाज: कुठे अधिक, कुठे कमी?
मे महिन्यात नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसात नेहमीपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, रायगड या भागांमध्ये मात्र पावसाची शक्यता नेहमीपेक्षा कमी राहणार आहे, तर रत्नागिरीत थोडासा अधिक पाऊस अपेक्षित आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही नेहमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनपूर्व पावसाचा पहिला टप्पा लवकरच
3 ते 4 मेपासून राज्यात पावसाचे वातावरण तयार होणार असून, त्याचा तपशीलवार अंदाज लवकरच हवामान विभागाकडून जाहीर होणार आहे.