अमरावती : येथील इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयामध्ये गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
यावेळी उद्घाटक म्हणून विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीच्या कार्यकारणी सदस्या प्रा. रागीणीताई देशमुख हृया होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना गृहअर्थशास्त्राच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा निर्माण करावा यावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लिना कांडलकर होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलींना गृहअर्थशास्त्राचा दैनंदिन जीवनात होणारा उपयोग याबाबतचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सिमा अढाऊ यांनी केले. अभ्यास मंडळाकरीता कार्यकारीणी सदस्य बी.ए भाग तीन च्या मयुरी कंगाले, शामल बोरकर, पूजा पिंजरकर बी.ए भाग दोन च्या अंकीता काळगंडे, प्रतिक्षा कडू बी.ए भाग एक च्या डीलेश्वरी नाईक यांचे अभ्यास मंडळ गठण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार बी. ए. भाग तीन च्या मयुरी कंगाले यांनी मानले.