Breaking News
Home / बातम्या / मा.आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या ” अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) ” येथे नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड बाबत विशेष शिबिर

मा.आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या ” अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) ” येथे नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड बाबत विशेष शिबिर

रामटेक : माजी विधानपरिषद आमदार  मुझफ्फर हुसैन यांनी अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) येथे, ‘काळी मिरी, महुगुणी, बांबू, ऊस, धान, गहू, तूर, मूग, अळशी, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, एरंडेल यांची नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात’, विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, महाराष्ट्र राज्य सुनील केदार असतील. तसेच माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे व आमदार आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहील.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम एन वेणूगोपाल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतील. काळी मिरी, महुगुणी व अन्य विशिष्ट मसाल्यांचे पिक घेतल्याने, विदर्भातील शेतकऱ्यांना कसा जास्त फायदा होऊ शकेल व त्याच्या लागवड पद्धतींबद्दल ते विशेष मार्गदर्शन करतील. सोबतच भारतीय वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी  सलीम सय्यद, बांबू लागवडीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या प्रयत्नातून आकारत असणाऱ्या नॅच्युरल फार्मिंगबद्दल हेमंत चव्हाण, SPNF तज्ञ मार्गदर्शन करतील.

या निमित्ताने पंचक्रोशीतील सरकारी कृषी अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच हे सदर महत्वाच्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित असतील. येत्या १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सदर शिबिर, अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF), छत्रपुर, गाव सराखा बोर्डा, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे संपन्न होईल.

मुझफ्फर हुसैन यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारा हा कृषी विशेष कार्यक्रम निश्चितच शेतकरी-कास्तकारांना महत्वपूर्ण उपलब्धी ठरेल.

तरी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकरी व कास्तकारांनी अस्मिता हाऊस, श्रीमती शांती सलोनी यांचे इथे 02228111185 व्हॉट्सअप/SMS :- +919324558593 किंवा नरेंद्र जिचकार 9850363244 या क्रमांकांवर नोंदणी करावी असे आवाहन मुझफ्फर हुसेन यांनी केले आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *