Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / कला ही संस्कृतीचा अलंकार आहे आणि संस्कृती ही कलेचा मुलभूत पाया आहे – प्रा रजनीशजी शुक्ल, कुलगुरु

कला ही संस्कृतीचा अलंकार आहे आणि संस्कृती ही कलेचा मुलभूत पाया आहे – प्रा रजनीशजी शुक्ल, कुलगुरु

अमरावती : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने श्री दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी उत्सव व्याख्यानमालेच्या आभासी कार्यक्रमात  ‘श्री दत्तोपंत ठेंगडीच्या दृष्टीने भारतीय कला’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रा. रजनीश शुक्ला, कुलगुरू, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा महाराष्ट्र हे प्रमुख वक्ता होते. संपूर्ण भारतातील भारतीय दृष्टीचे राष्ट्रीय साधक श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरणांजली अर्पण करीत त्यांच्या भारतीय कलाविषयक विचारांवर प्रकाश टाकतांना करताना ते म्हणाले की, ठेंगडीजींनी भारतातील विविध विषयांचे भारतीयकरण करण्याचे काम केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे एकत्रीकरण, कामगार, कारागीर, कुशल कामगार यांचा प्राधान्याने विचार करणारे ठेंगडीजी विचारवंत होते. देशाचे हित, सामाजिक हित आणि श्रमिक हित डोळ्यासमोर ठेवून ठेंगडीजी आपले कार्य केले. स्वदेशी चळवळीचे महान नेते, सामाजिक मतभेद आणि सामाजिक विषमता दूर करण्यात पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीचे संरक्षक म्हणून ठेंगडीजी ओळखले जातात.

प्रा रजनिशजी पुढे म्हणाले की भारतीय कलांची जागृती मानवी चेतनेत होते. आनंद कुमार स्वामी यांनी लिहिलेल्या ‘स्वदेशी इन आर्ट’ या पुस्तकावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की हिंदू जीवन दृष्टी सर्वोत्तम आहे.  स्वदेशी, स्वावलंबन, सुचित, मूल्यमापन आणि धर्म यांची स्थापना कलेच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ठेगडीच्या शब्दांत, कला ही संस्कृतीची रूपक आहे आणि संस्कृती ही कला अधिष्ठान आहे. या अलंकारासहच कुठलीही संस्कृती मौलिक बनते. उत्तम मनुष्याच्या निर्मितीचे तत्वज्ञान म्हणजे भारताची शाश्वत परंपरा असून भारतीय दृष्टीक्षेपात माणूस संपूर्णपणे साहित्य, संगीत आणि कला जाण ठेवतो.

हिंदू कला दृष्टी समजून घेण्यासाठी हिंदू जीवनदृष्टी सखोलपणे समजून घेणे आवश्यक आहे. कला ही मानवी आदर्शांच्या उदयासाठी एक साधन आहे. हि वैचारिक संकल्पना ठेंगडीजींनी संस्कार भारतीच्या स्थापनेनंतर मांडली होती. कला ही मानवी चेतना आणि आदर्श जनक आहे. भारतीय संस्कृतीचे उदात्त रूप भारतीय कलेशी जोडतांना ते म्हणाले की भौगोलिक विभागणीनंतरही येथे सांस्कृतिक एकता निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी श्री गुरुजींच्या ‘ओम राष्ट्र स्वाहा’ या कादंबरीवर प्रकाश टाकला.यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे माननीय अध्यक्ष प्रा. जगदीश प्रसाद सिंघल, महामंत्री शिवानंद सिंदेंकेरा, संघटन मंत्री महेंद्र कपूर यांच्यासह महासंघाचे देश तथा विविध राज्यातील पदाधिकारी व शैक्षणिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, कलाप्रेमी आणि मीडियाकर्मी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण एबीआरएसएम भारत या फेसबुक पेजवरून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन महाराष्ट्र राज्य महिला संवर्ग प्रमुख प्राचार्य डॉ मिनल भोंडे यांनी तर आभार महाराष्ट्राचे सह-मिडिया प्रमुख डॉ दिनेश खेडकर यांनी व्यक्त केले. 

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *