Breaking News
Home / बातम्या / “ सिझनल प्लांट्स ” – लागवड व संवर्धन, अमरावती गार्डन क्लब द्वारा ऑनलाइन कार्यशाळा

“ सिझनल प्लांट्स ” – लागवड व संवर्धन, अमरावती गार्डन क्लब द्वारा ऑनलाइन कार्यशाळा

अमरावती : आपल्या वैविध्यपूर्ण आयोजनातून नाविन्य जपण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावती गार्डन क्लब द्वारे बागप्रेमींच्या खास आग्रहास्तव रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी सौ. अलकाताई गभणे पुरस्कृत “सिझनल प्लांट्स” – लागवड व संवर्धन, या कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत करण्यात येणार आहे.

निसर्ग वेगवेगळ्या ऋतुनुसार या धरणीवर फुलांची सृष्टी वसवितो. प्रत्येक ऋतुत विविध फुले आपल्या बागेत फुलावी अशी सर्व बागप्रेमींची इच्छा असते. ज्यांना निसर्गाच्या पाना, फुलांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंशी विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी अमरावती गार्डन क्लब सदैव प्रयत्नरत असतो. थंडीच्या आगमनासोबतच कैलेंडुला, टोरेनिया, बालसम, साल्विया, इंपेशन्स, लिलियम, मैरीगोल्ड, ब्राझिलियन बटरफ्लाय, गजानिया, ग्लॅडिओलस, डायअँथस, पिटुनिया, पॅन्सी, जिरॅनियम, सिलोसिया या सारखी मनमोहक फुले सर्वाना आकर्षित करतात. दरवर्षी ऋतुमानानुसार निसर्गामध्ये बदल होत असतो.हिवाळ्यात बोचऱ्या थंडीपासून, उगवत्या वसंत तर तप्त उन्हापर्यंत,आम्ही नुतनीकरणाच्या सतत चक्रात असतो. याचा परिणाम म्हणून ,आम्ही ज्या हंगामात आहोत, त्या हंगामातील फुलांशी एकरूप होणे महत्त्वाचे आहे.

निसर्गाने ऋतुमानानुसार विविध रंगीत फुलांची उधळण केलेल्या सौन्दर्यत्मक  कलाकृतीचा आपल्या जीवनात व पर्यावणात अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. आपल्या कामावरील वातावरणाचा रोजच्या मनस्तिथीवर खुप परिणाम होतो. आमच्या भावनिक आरोग्यवर फुलांचा सकारात्मक प्रभाव पडतो. आनंद, शांतता, कल्याण आणि सहजतेची भावना जागृत होते. हिवाळ्यात हंगामी रंगबेरंगी फुले बघून प्रत्यकाचे मन प्रसन्न होत असते. हिच फुलांची उधळण आपल्या बागेत व्हावी याच उद्देशाने अमरावती गार्डन क्लबने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधन संपत्ती कमी पडू लागली आहे. शहरांचा विकास झपाट्याने होत असून बगीचे,शेती नाहीशी होत असली तरी शहरातील बंगल्यात नंदनवन फुलू लागले आहे. कमी जागेत घर बांधत असताना सुद्धा बगीचाचे प्लानिंग केले जाते. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे, केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकालाच इथे विशिष्ट जागा आहे. ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यानुसारच काही फळांचे सिझन असतात काही फुलांचा हंगाम असतो काही फुलझाडांची लागवड देखील विशिष्ट मोसमातच करावी लागते. आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे एप्रिल,मे या महिन्यातच लागतात.असे का होत असावे? खरतर यालाच निसर्ग म्हणतात. पावसाळा जवळ आला की शेतकर्यांच्या कामाची मोठी यादीच असते पण बागप्रेमिना सुद्धा झाडे लावायची हौस असते. एखाद्या कुंडीत झाड लावण्यासाठी पावसाळ्याची वाट बघायला नको पण पुढचा टप्पा म्हणजे कोणती झाड लावायची? बारमाही फुलझाडांमध्ये काही फुल, झाडांवर १-२ दिवस राहतात. काही ५-६ दिवस राहतात, तर काही सकाळी उमलून संध्याकाळी मावळतात किंवा संध्याकाळी उमलून सकाळी मावळतात या सर्व प्रकारातील फुल आपल्याकडे असावीत अस सगळ्यानाच वाटत असत. काही फुल ऋतुनुसार फुलतात आणि अशी हि रंगबिरंगी फुले बागेला उठाव देतात.

मागील चार दशकांपासून स्वत: वेगवेगळे प्रयोग करून ज्यांनी या क्षेत्रात विशेष ज्ञान आणि अनुभव संपादन केला आहे असे प्रा. डॉ. व्ही. आर. देशमुख, मानद सदस्य, इंडियन रोज फेडरेशन, माजी अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब आणि वनस्पतिशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. या कार्यशाळेदरम्यान लागवडीच्या संपूर्ण तंत्राचे प्रात्यक्षिक श्री सुभाष भावे, उपाध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब आणि संचालक, किरण नर्सरी अँड गार्डन्स करणार आहेत.

गार्डन क्लबच्या विविध प्रदर्शनात अनेक गटांमध्ये स्पर्धा होत असते. सिझनल फ्लॉवर्स गटासाठी डॉक्टर शुभांगी इंगोले पुरस्कृत स्व. श्रीकांत इंगोले स्मृती चषक प्रदान करण्यात येत असतो.  या चषकावर आपले नाव कोरण्यासाठी कार्यशाळेत मिळणाऱ्या सूचना व मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. राज्यभरातून सर्व बागप्रेमींनी आपला बगीचा रंगीबेरंगी फुलांनी बहरविण्याच्या दृष्टीने सहभागासाठी डॉ. डॉ रेखा माग्गीरवार, सचिव, गार्डन क्लब आणि संपूर्ण कार्यकारिणी तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यशाळेसाठी देणगी निधी रू. १००/- क्लबच्या वेबसाईटवर दिलेल्या खात्यात जमा केल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरील नोंदणी फॉर्म मध्ये आपली माहिती सबमिट करावी. नोंदणी केलेल्या सदस्यांना कार्यशाळेसाठी झूम मिटिंगचा तपशील ईमेलवर पाठविण्यात येईल. https://forms.gle/USwLfW53tfzaVHDy9

विस्तृत तपशिलासाठी क्लबच्या खालील वेबसाईटवर संपर्क साधावा.

www.agca.webs.com

संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक- अध्यक्ष- डॉ. दिनेश खेडकर 9423622287, उपाध्यक्ष- श्री. सुभाष भावे ९४२३४२६४२४, कोषाध्यक्ष- डॉ. शशांक देशमुख ९८९०९२८४१० आणि सचिव- डॉ. रेखा मग्गीरवार ९८२२५७६०६६

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *