Breaking News
Home / बातम्या / २५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ.नितीन राऊत

२५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ.नितीन राऊत

मुंबई : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन  शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री ना.डॉ नितीन राऊत यांनी सांगितले.  

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यावरील सुमारे २५ हजार  शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२००० कोटी रु. पर्यंत पोहचला आहे व कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरण करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करतेवेळेस त्या वीज वाहिन्यावरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा  भरणा करणे अपेक्षित आहे.

सदर योजना यशस्वी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याकरिता वरील उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू वीजबिल भरुन उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकिय अथवा खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार  राज्यातील कृषिपांना दिवसा ८ तास व  रात्री १० तास आठवडयात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *