Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / कोकणचे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु!बाळासाहेब थोरात.

कोकणचे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु!बाळासाहेब थोरात.

मुंबई :निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची मोठी हानी झाली झाली असून चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणचे हे नंदनवन कोलमडून पडले आहे. हे नंदनवन पुन्हा उभे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी रायगड जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदतकार्याची पाहणी केली. रायगड जिल्ह्यातील पेडणेकरवाडी, नागाव येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. सरकार कोकणच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही.

शासन नियमापेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला असून ही मदत पीडितांपर्यंत लवकर पोहचेल यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करावेत, अशा सुचना थोरात यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ हे उपस्थित होते.

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *