Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / वनविभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा – संजय राठोड

वनविभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा – संजय राठोड

मुंबई : महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेचा आढावा मंत्री. श्री. राठोड यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते.

निसर्ग पर्यटन मंडळाचे बळकटीकरण

            वनमंत्री श्री. राठोड  म्हणाले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे बळकटीकरण करण्याची गरज आहे . त्यादृष्टीने या मंडळातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशा सूचना त्यांनी केल्या.निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास त्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांमध्ये वनसंरक्षणाबाबत जागृती निर्माण करावी तसेच या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याचे निर्देशही मंत्री. श्री.राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पर्यटकांना सुविधा देणार

            श्री. राठोड पुढे म्हणाले, निसर्ग पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याची गरज आहे. वनक्षेत्रातील रस्ते तसेच निवासाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी असे निर्देशही मंत्री. श्री राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.

        यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू, नितीन काकोडकर, पी. साईप्रकाश तसेच महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *