Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम / कृषी पर्यटन व्यवसायाला यंदा सुगीचे दिवस

कृषी पर्यटन व्यवसायाला यंदा सुगीचे दिवस

उशिरा सुरु झालेला पाऊस काही काढता पाय घेता घेइना !

महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात काही भाग वगळता दमदार पाऊस झालेला आहे.बहुतांश जलाशये तुडूंब भरलेली असून लवकरच पर्यटन सुरु होणार आहे. यंदा दमदार झालेल्या पावसामुळे रब्बी हंगाम जोरात राहणार असल्यामुळे कृषी पर्यटन सुद्धा तेजीत येणार असल्याने पर्यटक आणि कृषी उदयोजक सुखावले आहेत .

आता वाट आहे फक्त परतीच्या पावसाची जाण्याची कारण तो सुद्धा या फुललेल्या राना – वनाच्या मोहात पडला आहे !

दरवर्षी दिवाळी दरम्यान शेतावर राहण्याची मौज असते ,तसेच चुलीवर बनविलेल्या गावरान जेवणाची लज्जतच काही भारी असते,शहरातील रोजच्या धका -धकीच्या आयुष्यातून निवांत क्षणांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक आता कृषी पर्यटना कडे वळू लागलेले आहे हीच योग्य संधी शेतकऱ्यांना व्यवसाय वृद्धी करिता सुखावत आहे !

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात कृषी पर्यटनाची रेलचेल असणार आहे !

About Editor Desk

Check Also

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *