Solapur pik Vima update गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट मिळाला आहे. मंजूर झालेल्या पीक विम्याचे वितरण अखेर सुरू झाले आहे.
शनिवारपासून वितरणाची प्रक्रिया सुरू
शनिवारपासून पीक विमा वितरण सुरू होईल, अशी माहिती याआधी देण्यात आली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे, अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 131 कोटी रुपयांचे वितरण
सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे 131 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे. एकूण अंदाजे 230 ते 280 कोटी रुपयांपर्यंतचा विमा जिल्ह्यात वाटप केला जाईल, असा अंदाज आहे.
यापूर्वी इतर जिल्ह्यांत वितरण सुरू झाले होते
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेल्या पीक विम्याचे वाटप यापूर्वीच सुरू झाले होते. मात्र सोलापूर आणि अहिल्यानगरसारख्या काही जिल्ह्यांमध्ये उशिरा मंजुरी मिळाल्यामुळे वाटपाची प्रक्रिया थांबली होती.
करमाळा, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर प्रमुख केंद्र
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने क्लेम दाखल करण्यात आले होते.
दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
या टप्प्यात दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झाले असून, विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांचे वितरण सुरू झाले आहे.
इतर जिल्ह्यांचेही अपडेट लवकरच
इतर जिल्ह्यांतील पीक विम्याच्या वितरणासंबंधीचे अपडेट्स मिळताच ते देखील वेळोवेळी कळवले जातील.