mahadbt Yojana नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – अंतिम तारीख २ जून

mahadbt Yojana राज्य सरकारच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३ मे २०२५ पासून सुरू झाली असून ती २ जून २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. ही योजना शेतकरी, बेरोजगार तरुण, बचत गट आणि महिला गटांसाठी उपयुक्त आहे.

गाई-मशी गट, शेळीपालन, कुकुटपालन यासारख्या योजनांचा लाभ

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गाई-मशींचे गट, शेळीपालन, कुकुटपालन अशा स्वरूपातील विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. अर्ज करताना आपण संबंधित गट निवडावा लागेल.

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन आवश्यक

अर्जदारांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. आधीपासून नोंदणी असलेल्या व्यक्तींनी थेट लॉगिन करून अर्ज भरावा. नवीन अर्जदारांनी प्रथम नोंदणी करावी लागते.

हे पण वाचा:
Fertilizer Shortage Solution खत टंचाईवर मात (Fertilizer Shortage Solution): ‘कृषिक’ ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान (Krushik App for Farmers)

नोंदणीसाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे mahadbt Yojana

नोंदणी करताना खालील माहिती व कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार क्रमांक
  • नाव, लिंग, जिल्हा, तालुका, गाव
  • जात व प्रवर्ग, दिव्यांग असल्यास माहिती
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • बँक तपशील (IFSC कोड, खाते क्रमांक)
  • जमीनधारक असल्यास त्याची माहिती
  • पासपोर्ट साईज फोटो (80 KB पेक्षा कमी)
  • स्वाक्षरीची प्रत

घरातील सदस्यांची माहिती व रेशनकार्ड तपशील आवश्यक

अर्ज भरताना रेशनकार्डानुसार घरातील स्त्री-पुरुष संख्याही भरावी लागते. अर्ज करताना सर्व अटी व शर्ती वाचून मान्य करणे बंधनकारक आहे.

अर्ज पूर्ण केल्यानंतर अंतिम सबमिट आवश्यक

अर्ज भरून झाल्यावर “जतन करा” आणि नंतर “सबमिट” पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे. एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो दुरुस्त करता येत नाही, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सबमिट झाल्यावर अर्ज क्रमांक मिळतो, त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवावी.

हे पण वाचा:
dr ramchandra sable हवामान अंदाज (Weather Forecast): मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon Rain) आणि महाराष्ट्रासाठी पावसाचा अंदाज (dr ramchandra sable)

पूर्वी अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

पूर्वी अर्ज केलेले लाभार्थी वेटिंग यादीत आहेत. त्यांची पुढील प्रक्रिया लॉटरी किंवा निवड पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ नवीन अर्जदारांनीच अर्ज करावा.

मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून योजना भरली होती का? 🤔

कोणत्या योजनेचा लाभ मिळवलाय?
त्या प्रक्रियेत काही अडचणी आल्या का?
काही अडथळे, तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांची अडचण…? तुमचं मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा!👇

हे पण वाचा:
Maharashtra Pre-Monsoon Rain महाराष्ट्रात मान्सूनपूर्व वादळी पावसाची स्थिती: पुढील काही दिवस पावसाचा अंदाज (Maharashtra Pre-Monsoon Rain, Rainfall Forecast Maharashtra)

Leave a Comment