Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 2)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षासंबंधी विद्यार्थ्यांना जाहीर मार्गदर्शन

अमरावती : विद्यापीठाद्वारा राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासंबंधी निर्देश जाहीर करण्यात आले. या निर्देशांमधील सर्व कार्यपद्धती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व त्यांच्या संपूर्ण शंकांचे निरसन व्हावे यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच तर्फे मार्गदर्शक संवाद आयोजित करण्यात आला होता. झूम मीटिंगच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिक्षण …

Read More »

विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये – शिक्षण मंच

अमरावती : नुकतेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पीएचडी पदवीसाठी प्रवेशित आणि नॅशनल डॉक्टरल फेलोशिप प्राप्त संशोधक विद्यार्थ्यांना सक्त ताकीद देणारी सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांच्या विद्यापीठात संशोधक विद्यार्थी म्हणून नोंदणी बाबत दस्तावेज सादर करण्यासाठी आदेशित केले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात २०१४ पासून भला मोठा खंड पडला असून कुठल्याही विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात झालेली नाही. यामुळे तंत्रशिक्षण परिषद, यूजीसी, सीएसआयआर, डीएसटी, डीबिटी, अशा अनेक केंद्र तथा राज्य सरकारच्या योजना …

Read More »

प्रभात एज्यु. सोसायटी येथे संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अमरावती : स्थानिक खोलापुरी गेट येथील सामाजिक,, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्मयोगी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्रभात एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री वि. दा. पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान नगर विकास समितीचे उपाध्यक्ष …

Read More »

शैक्षिक महासंघाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ राष्ट्र, शिक्षण आणि शिक्षक यांच्या हितासाठी काम करणारे राष्ट्रीय संघटन असून समाज आणि सरकार यांच्यातील समन्वय साधणारी सातत्यपूर्ण चळवळ आहे. असे मत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जे. पी. सिंघल यांनी फेडरेशनच्या उच्च शिक्षण संवर्गातील अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या दोन दिवसीय ऑनलाइन बैठकीच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले. …

Read More »

वाढीव गुणासाठी प्रस्ताव सादर करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

अमरावती :  शैक्षणिक वर्ष  2019-20 मधील शालेय खेळाडू, एन.सी.सी. आणि स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय मंडळ कार्यालयाकडे  सादर करण्यास  दिनांक 25 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी 12 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करण्यास …

Read More »

विद्यार्थ्यांनी साधला थेट परीक्षा संचालकांशी संवाद शिक्षण मंचच्या पुढाकाराला अभूतपूर्व प्रतिसाद ७२२८ विद्यार्थी सहभागी

अमरावती : शासनाद्वारे लॉकडाऊनच्या सीमा सातत्याने वाढविण्यात येत असून त्यानुसार विद्यापीठ परीक्षांच्या संबंधात देखील नवनवीन बदल सुचविणाऱ्या बातम्या सर्व विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकत आहेत. या सर्व बाबीवर थेट संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचने “मुक्त संवाद” या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन …

Read More »

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परिक्षा नियोजनाचा कृति आराखडा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केला जाहीर

मुंबई : राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जाहिर केला. कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे कृषि …

Read More »

उच्च शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण प्राचार्य पदा-संदर्भात शैक्षिक महासंघाचा पाठपुरावा अभिनंदनास्पद – प्रा. प्रदीप खेडकर

अमरावती :अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाद्वारा उच्च शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले प्राचार्य पद काल मर्यादित नसावे याकरता गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा शासन दरबारी करीत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने रेगुलेशन – २०१० अंतर्गत प्राचार्यपदासाठी पाच वर्षाची कालमर्यादा घालून दिली. पुढील रेगुलेशन मध्ये ही कालमर्यादा महत्तम दहा …

Read More »