Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम (page 4)

ॲग्रो टुरिझम

अमरावतीकरांनी वसविलेल्या फुलांच्या विश्वात मन प्रसन्न झाले : सुबोध भावे

अमरावती : आपल्या वैविध्यपूर्ण आयोजनांच्या शृंखलेत अमरावती गार्डन क्लबद्वारा आयोजिलेला फुलोत्सवा मध्ये जवळपास ३०० च्या वर विद्यार्थी, महिला आणि पुष्पप्रेमी नागरिकांनी आठ गटात नाविण्यपूर्ण रचना सादर केल्या.हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या देशाचे भवितव्य आज आपल्या तरुणाईच्याच हातात आहे,तेव्हा त्यांचे प्रबोधन करून योग्य प्रवाहात घेऊन जाण्याच्या भावनेतून तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कल्पकतेला …

Read More »

पर्यटकांना खुशखबर : माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून पतंग महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे. येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 12 जानेवारी दरम्यान …

Read More »

वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम ९७५ चौ.कि.मीची वाढ

मुंबई : केंद्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २०१७ च्या तुलनेत ९८३१ चौ.कि.मी हून वाढून २०१९ मध्ये १०,८०६ चौ.कि.मी इतके झाले आहे. ही वाढ ९७५ चौ.कि.मी आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या वनाच्छादनात सुद्धा ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. …

Read More »

शबरीमला यात्रा भाविकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन

मुंबई : केरळ येथे शबरीमला उत्सव साजरा करण्याकरीता जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यभरातून अनेक भाविक केरळला शबरीमला उत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. त्यामुळे सर्वांनाच रेल्वेचे तिकीट उपलब्ध …

Read More »

कृषिमित्र फार्म काटोल मॉडेल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर 

नागपूर  : वक्तृत्व-कर्तृत्व आणि नेतृत्व गुण अंगीभूत लाभलेले कृषिमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश ठाकरे ह्यांच्या कार्याचा सुगंध अमेरिकेत सुद्धा दरवळत आहे ,त्यांनी चालविलेल्या चंदन शेती नर्सरी च्या सुगंधाच्या शोधात सातासमुद्रापारची मंडळी नुकतीच काटोल ला आली होती.  कृषिमित्र फार्म येथे रुरल बिझनेस हब अंतर्गत काटोल मॉडेल म्हणजेच कृषि मित्र फार्म येथे अमेरिका येथून …

Read More »

वृक्ष-संपदेच्या वैविध्यतेने समृद्ध नागनगरी

नागपूर :  नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्यता अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही हे वैविध्य औत्सुक्यपूर्ण ठरत आहे. नागपूरचे विधिमंडळ जेथे आहे तो परिसर सिव्हील लाईन्स म्हणून ओळखला जातो. हा परिसरही वृक्षराजीने संपन्न …

Read More »

शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या यात्रेकरूंनी सुरक्षित प्रवासासाठी अधिकृत व तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या प्रवासी वाहनांतूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले …

Read More »

वन विभाग उभारणार डीएनए प्रयोगशाळा प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला

मुंबई : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया  सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद …

Read More »

२७९ फुलपाखरांच्या प्रजातींचे वन विभागाने केले मराठीत “बारसे”

मुंबई : “नीलवंत हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ?’’ निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले  मराठी नाव असून, हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. देशात आढळून येणाऱ्या १५००  आणि महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या २७९ फुलपाखरांच्या प्रजातींची नावे इंग्रजीत आहेत. ही नावे मराठीत …

Read More »

खुशखबर : कर्नाळा अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई : संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने १२.११ चौ.कि.मी च्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमलेन भरलेले दिसते. पक्षांसाठी जाहीर करण्यात …

Read More »