Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 4)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

आठवीतील धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई  : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या,  दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या …

Read More »

महिंद्रा कंपनीतर्फे ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी 14 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : राज्यशासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर निधी अंतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे चौदा कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधान भवन येथे महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  सुपूर्द केला.      यावेळी उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

सोनेगाव लोधी येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

नागपूर : कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा सर्कल मध्ये मोतीबिंदूचे उच्चाटन करण्याचे लक्ष नियोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सोनेगाव लोधी येथे ग्रामपंचायत भवन मध्ये निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात सोनेगाव व आजूबाजूच्या गावातील ५५ रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. त्यात …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त कर्मयोगी फाऊंडेशनचा माझ्या ताईला साडी हा नाविन्यपूर्ण उपक्रम…

नागपूर : कर्मयोगी फाऊंडेशन गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीनुसार बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करते. त्याचीच फलश्रुती म्हणजे बुटीबोरी जवळील देवळी गुजर या गावी जागतिक महिला दिनानिमित्त पहायला मिळाली. चांगलं कार्य करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या १७ महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच महिलांसाठी रांगोळी …

Read More »

मोर्शी तालुक्याला लागले ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध !

मोर्शी : तालुक्यातील ३९ गावामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली  असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र मोर्शी तालुक्यात सर्वत्र निर्माण झाले आहे.मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात …

Read More »

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्याकरिता आता उर्वरीत १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना  ८० टक्के अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.             श्री. भुसे …

Read More »

सेव्ह सुमित कॅम्पेन यशस्वी – हृदयाचा एक व्हॉल्व रिप्लेस तर एक रिपेअर करण्यात डॉक्टर यशस्वी

अमरावती : तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागाचा विद्यार्थी सुमित गणेशराव गांजरे याच्यावर बुधवारी तब्बल ६ तास व्हॉल्व रिप्लेसमेंट व एक व्हाल्व रीपेअर करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सुमीतचा राठी नगर येथील बूब हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल, नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल असा सतत २० …

Read More »

शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार !

मोर्शी : वरुड तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असून पाण्याची पातळी १००० ते १५०० फूट खोलीवर गेली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे , पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची चांगलीच कमतरता भासत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता  कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी …

Read More »

होळी पेटवितांना पुरेशी काळजी घेण्याचे महावितरणचे आवाहन

अमरावती : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये या करिता होळी पेटवितानाच संभाव्य हानी आणि अपघात टाळण्यासाठी आव्यश्यक ती सर्व खबरदारी घेऊन होळीचा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरण कडून करण्या आले आहे.      होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वालांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भिषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या हया भुमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भुमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटवितांना शक्यतो मोकळया जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतीक अपघातास कारणीभूत ठरू शकते.             त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकतांना ते रोहित्र तसेच वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळतांना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने वीजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबा सभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने महावितरणच्या आवाहनाप्रमाणे खबरदारी घेऊन होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरण अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Read More »

येरणगाव येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

हिंगणा : कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा सर्कल मध्ये मोतीबिंदूचे उच्चाटन करण्याचे लक्ष नियोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हिंगणा तालुक्यातील येरणगाव या आदिवासी दुर्गम भागात येरणगाव येथिल आश्रम शाळेमध्ये निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात येरणगाव व आजूबाजूच्या गावातील ५४ रुग्णांनी …

Read More »